कोपरगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

कोपरगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील सुभाषनगर येथील 34 वर्षीय तरुणाने आज सकाळी साडेसात वाजेच्या पूर्वी गोदावरी नदीपात्राजवळील दत्त पाराजवळ गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मयत वाल्मिक दगडू आवारे हा नगरपरिषदेत काही महिन्यांपूर्वी आरोग्य विभागात कर्तव्यावर होता. त्यामुळे नगरपरिषदेत कामावर असलेल्या कर्मचार्‍याचा हा सलग आठ महिन्यांत तिसरा मृत्यू ठरला आहे. मयत वाल्मिक हा दोन दिवसांपूर्वी पासून गायब होता. आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी वडील दगडू दौलत आवारे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यू रजि. नंबर 38/2019, सी.आर.पी.सी.174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एच. गायमुखे हे करत आहेत. दरम्यान, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या दुर्देवी घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *