नील स्वर सखी मंचच्या संगीत मैफिलीत श्रोते मंत्रमुग्ध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सह्याद्री महाविद्यालयाच्या के. बी. दादा सभागृहात नील स्वर सखी मंचने दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘मानसीचा चित्रकार तो…’ हा महान संगीतकार, वसंत देसाई, वसंत पवार व वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेल्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर आयोजित केला होता. यातील सदाबहार गाण्यांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध होवून गेले होते.

या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. जयश्री थोरात, डॉ. हसमुख जैन, सह्याद्री महाविद्यालयाचे उपप्राचार्य नवले आदिंनी उपस्थिती लावली होती. या संगीत मैफिलीत निलांबरी कोर्टीकर, डॉक्टर ओंकार कोर्टीकर, संज्योत वैद्य व विकास भालेराव यांनी गायन केले. केदार तांबोळी यांनी हार्मोनियमची साथ केली. सिंथेसाइजरवर एडविन यांनी साज चढवला. चित्तरंजन कोर्टीकर, अजित गुंदेचा व गणेश बिडवे यांनी तबलयाची साथ केली. साईड रिदमची प्रथमेश बिडवे यांनी साथ केली. तर प्राध्यापक डॉ. अनंत दिवेकर यांनी निवेदन केले. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह प्रक्षेपित केल्यामुळे संगमनेरमधील अनेक रसिकांसह सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद, अहमदनगर, तसेच अमेरिकेतील अनेक रसिकांनी आनंद घेतला.

Visits: 190 Today: 1 Total: 2056164

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *