भंडारदरा परिसरा आढळला दुर्मिळ ‘स्वर्गीय नर्तक’ पक्षी पहिल्यांदाच दर्शन झाल्याने पक्षीप्रेमींसह वन विभागात आनंद
नायक वृत्तसेवा, राजूर
भंडारदरा जलाशय जवळील प्रवरा नदीच्या परिसरात दुर्मिळ स्वर्गीय नर्तक पक्षाचा वावर असण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कळसूबाई परिसरातही पक्षी निरीक्षकांना हा पक्षी आढळल्याची नोंद आहे. दरम्यान गिते हे कळसूबाई अभयारण्यात वनपाल म्हणून कार्यरत आहेत. ते भंडारदरा परिसरात प्रवरा नदीतीरावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना लांब शेपटी आणि पांढर्या रंगाचा स्वर्गीय नर्तक पक्षी (प्याराडाइज फ्लाय केचर) दिसला. सुमारे तासभर या स्वर्गीय नर्तक नराचे निरीक्षण त्यांनी केले. यावेळी त्यांना या पक्षाची मादीही आढळून आली.
या पक्षाच्या दोन प्रजाती आहेत. एक जात भारतात तर दुसरी जात श्रीलंकेत आढळते. नराला लांब शेपूट असते, त्यामुळे तो अतिशय देखणा दिसतो. पूर्ण वाढ झालेला नर पांढर्या रंगाचा असतो, तर लहान नर आणि मादी लाल रंगाची असते. स्वर्गीय नर्तकाची मान व चोचीकाडील भाग काळपट गडद रंगाचा असतो. डोक्यावर लहान तुरा, दोन पिसाची दीड फूट लांब असणारी शेपटी यामुळे त्याचे सौदर्य अधिक खुलून दिसते. मध्य प्रदेशचा राज्य पक्षी म्हणून त्याची ओळख आहे.
स्वर्गीय नर्तकचा वावर मुख्यतः उत्तर प्रदेशमधील जंगलात आढळतो. मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणात आढळतो. हिंदीमध्ये त्याचे ‘दूधराज’ असे नाव आहे ‘स्वर्गीय नर्तक’ हवेत संचार करत असताना शेपटीमधील त्याच्या दोन पिसांची हालचाल कापडी रिबन हवेमध्ये फिरवल्यासारखी सुंदर दिसते. लहान किडे, अळ्या हा स्वर्गीय नर्तकचा प्रमुख आहार आहे. हा पक्षी परिसरातही पक्षी निरीक्षकांना आढळून आला आहे. या पक्षाचे भंडारदरा परिसरात पहिल्यांदाच दर्शन झाल्याने मोठा आनंद झाला आहे.
मध्य प्रदेशातील बांधवगड राष्ट्रीय उद्यानात स्वर्गीय नर्तक मोठ्या प्रमाणात आढळतो. दुर्मिळ स्वर्गीय नर्तकचं अस्तित्व सह्याद्रीतील असून काही कालावधीसाठी दख्खनच्या पठारांवर स्थलांतर केले होते. हवेत उडून किडे पकडून खाण्याची त्याखी खासियत आहे. हवेत उडत असताना लांबदार शेपटी असलेला हा पक्षी पंतगासारखा दिसत असल्याने जणूकाही नाचतच असल्याचाच भास होतो. त्याला दाट झाडीत राहायला आवडते. आता तो भंडारदरा परिसरात दिसल्याने पक्षीप्रेमींमध्ये आनंद पसरला आहे.