सर्वसामान्य रुग्णांना ग्रीनपल्स नक्कीच फायदेशीर ठरेल ः आ. डॉ. तांबे ग्रीनप्लस फार्मसीची 24 तास सेवा संगमनेरकरांसाठी उपलब्ध

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रीनप्लस फार्मसीच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना एकाच ठिकाणी औषधे उपलब्ध करून देण्याचे काम ग्रीनप्लस फार्मसी नक्कीच संगमनेरकरांना उपलब्ध करून देतील असा आशावाद आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केला आहे.

संगमनेर येथील मालदार रोडवर शिंदे परिवाराच्या सुरू झालेल्या समर्थ ग्रीनप्लस मेडिकल शॉपीचा शुभारंभ पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, शेतकी संघाचे अध्यक्ष संपत डोंगरे, माजी नगराध्यक्षा विश्वास मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, सुंनदा दिघे, विवेक कासार, माजी जिल्हा परिषद सदस्या जिजाबाई शिंदे, ग्रीनप्लस कंपनीचे अजय मोदाणी, उमेश पवार, सेवानिवृत्त अधिकारी अशोक शिंदे, सुरेखा शिंदे, डॉ. स्वाधीन शिंदे, डॉ. गोपी शिंदे, डॉ. प्रीती शिंदे, कोमल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदे परिवार समाजाशी एकरूप झालेला परिवार आहे. या परिवाराचे सर्व क्षेत्रांमध्ये चांगले योगदान राहिले आहे. पूर्वीच्याकाळी डॉक्टरच औषधे देत होती. मात्र आता आता फार्मसीतून औषधे मिळत आहेत. रुग्णांना जे औषध हवे आहे ते औषध वेळेत उपलब्ध करून देण्याचे काम श्री समर्थ ग्रीनप्लस फार्मसीच्या माध्यमातून नक्कीच होईल असा आशावाद आमदार डॉ. तांबे यांनी व्यक्त केला. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाले, संगमनेर शहर हे मेडिकलचे हब होत आहे. त्यामध्ये आता श्री स्वामी समर्थ ग्रीन प्लस फर्मसीची महत्त्वपूर्ण भर पडली असल्याचे त्यांनी सांगितले. माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, विवेक कासार, प्राचार्य मच्छिंद्र दिघे यांनी शुभेच्छा दिल्या. ग्रीन प्लस फार्मसीतून चोवीस तास सेवा मिळणार असून हेल्थ गोल्डकार्ड उपलब्ध करून दिले गेले आहे. त्याचा लाभ घ्यावा संगमनेरकरांनी घ्यावा आवाहन डॉ. प्रीती शिंदे यांनी केले. ग्रीनप्लस फार्मसीचे संगमनेरमध्ये दालन नाशिक नंतर प्रथमच सुरू झाले आहे. याठिकाणी सर्व प्रकारच्या औषधी रुग्णांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे ग्रीनप्लस फार्मसीचे अजय मोदाणी यांनी सांगितले. स्वागत अशोक शिंदे यांनी केले असून, सूत्रसंचालन नीलेश पर्बत यांनी केले. तर आभार डॉ. स्वाती शिंदे यांनी मानले.
