दुर्गा तांबे यांचा वाढदिवस वृक्ष संवर्धन दिन म्हणून साजरा! एकादशी निमित्ताने संगमनेरात २५२५ झाडांचे रोपण नायक वृत्तसेवा, संगमनेर माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराने स्वच्छ, व सुरक्षित शहर म्हणून राज्यात लौकिक मिळवला आहे. नागरिकांना आधुनिक व चांगल्या सुविधा देण्याबरोबर नगरपालिकेने स्वच्छतेत देश पातळीवरील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीच्यानिमित्त शहरात २५२५ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यानिमित्त रविवार तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात आला. शहरातील समता नगर, मार्केट कमिटी, पवार मळा, गंगामाई घाट यांसह विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ.मैथिली तांबे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रमिला अभंग यांच्यासह शहरातील विविध महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.दंडकारण्य अभियानाच्या प्रकल्प प्रमुख असलेल्या दुर्गा तांबे या अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस करत असून या वाढदिवसानिमित्त यावर्षी शहरात २५२५ वृक्षांचे रोपण करण्यात आले व या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक कार्यकर्त्यांवर देण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व संवर्धनाची जबाबदारी कार्यकर्ते घेत असून हा दिवस तालुक्यात वृक्ष संवर्धन दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा झाला. चौकट : मागील दहा वर्षांमध्ये संगमनेर शहरांमध्ये विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. रस्त्यांच्या दुतर्फा फुल, झाडे याचबरोबर मोकळ्या जागेमध्ये झाडे रोपण करण्यात आले आहे. आज ही झाडे मोठी झाली असून उन्हाळ्यामध्ये नागरिकांना या झाडांची छान गार सावली मिळत आहे.

 नायक वृत्तसेवा, संगमनेर  माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहराने स्वच्छ, व सुरक्षित शहर म्हणून राज्यात लौकिक

Read more

निझर्णेश्वर विद्यालयात विठू नामाची शाळा भरली  ‘जय हरी माऊली’ म्हणत ग्रामस्थांनी घेतले दर्शन 

  नायक वृत्तसेवा, कोकणगाव  आषाढी एकादशीनिमित्त संगमनेर तालुक्यातील कोकणगाव – शिवापुर येथील निझर्णेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडी काढत विठू नामाची शाळा

Read more

‘शिवराष्ट्र हायकर्स’ च्या ‘ पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेला उदंड प्रतिसाद

नायक वृत्तसेवा,  संगमनेर  ‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’  आयोजित ‘पन्हाळगड ते पावनखिंड’  या महत्वाकांक्षी ३३ व्या देशव्यापी साहस मोहिमेसाठी महाराष्ट्रातून  प्रतिसाद मिळत

Read more

विविध संतांच्या वेशभूषेत बाल वारकऱ्यांचा  दिंडी सोहळा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर  तालुक्यातील पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार

Read more

आई-वडील व शिक्षण संस्था यांना विसरू नका : माने

नायक वृत्तसेवा, अकोले  आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही मोठ्या पगाराची नोकरी,  व्यवसाय करा, पण या यशामागील खरे मानकरी असलेले आई-वडील,

Read more

नियुक्ती देण्यासाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले  सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या रोजंदारी कर्मचारी अद्यापही

Read more

संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजय फटांगरे

नायक वृत्तसेवा, संगमनेर  संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय नारायण फटांगरे यांची  निवड करण्यात आली आहे. तर

Read more

खेमनर यांच्या पुण्यतिथीनिमित्त १००१ रोपांचे वृक्षारोपण

नायक वृत्तसेवा, साकूर   माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.अशोक खेमनर यांच्या पुण्यतिथी निमित्त संगमनेर तालुक्यातील साकुर येथे १००१ रोपांचे वृक्षारोपण करण्यात

Read more

श्री साई चरित्र पारायणाला उत्साहात प्रारंभ! भक्त चरित्र पठनात तन्मय; विद्युत रोषणाईने मंदिर सजले

नायक वृत्तसेवा, संगमनेर  अमृतवाहिनी प्रवरा आणि म्हाळुंगी संगमावर वसलेल्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून अखंड साई चरित्र पारायणाला उत्साहात

Read more

सी.ई.टी परीक्षाप्रकरणी दोषीवर कारवाई करा : आ. खताळ  विषयतज्ञांना नोटीस बजावल्याचे मंत्री पाटील यांचे उत्तर

नायक वृत्तसेवा, संगमनेर   महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षा मार्फत २८ हजार ८३७ विद्यार्थ्यांसाठी , ४ मे २०२५ रोजी एमएचटी-सीईटी

Read more