खेमनर यांच्या पुण्यतिथीनिमित्त १००१ रोपांचे वृक्षारोपण

नायक वृत्तसेवा, साकूर
माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.अशोक खेमनर यांच्या पुण्यतिथी निमित्त संगमनेर तालुक्यातील साकुर येथे १००१ रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सेवा भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व.अशोक खेमनर यांना पुण्यतिथी निमित्त विद्या प्रबोधिनी प्रशाळेत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी येथील खंडोबाच्या डोंगरावर आणि देवी पठार डोंगरावर स्व. अशोक खेमनर यांच्या आठवणींना उजाळा देताना दरवर्षी १००१ रोपं लावून वृक्षारोपण केले जाते.यावेळी बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, सरपंच सचिन सोनवणे, भाऊसाहेब सागर, आल्लीभाई मोमीन, हेमचंद्र होळकर, अनमोल खेमनर, दिनकर भगत, विद्याप्रबोधिनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Visits: 352 Today: 5 Total: 1109449
