नियुक्ती देण्यासाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आश्रमशाळांमध्ये काम करणाऱ्या वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या रोजंदारी कर्मचारी अद्यापही नियुक्ती आदेशाविना कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ नियुक्ती देण्यासाठी राजूरच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देत मागणी केली.

१६ मे पासून शासकीय आश्रमशाळांचे कामकाज सुरू असून, कर्मचारी अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.गेल्या १३ ते १४ वर्षांपासून नियमितपणे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ नियुक्ती आदेश देण्यात यावेत, या मागणीसह विविध प्रश्नांवर राजुरच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात करण्यात आले. या निवेदनामध्ये शासनाच्या बाह्यस्रोताद्वारे शिक्षक व वर्ग ४ कर्मचार्यांची भरती करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.हा आदेश आदिवासी भागातील गोरगरिबांच्या रोजगारावर गदा आणणारा अन्यायकारक आहे. आर्थिक दृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या सुमारे १४० ते १५० कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे भविष्य या रोजंदारीवर अवलंबून आहे. शासनाने या रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश देऊन त्यांच्या नोकरीचे संरक्षण करावे, कायमस्वरूपी आदेश द्यावेत, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. 

Visits: 70 Today: 2 Total: 1105801
