श्री साई चरित्र पारायणाला उत्साहात प्रारंभ! भक्त चरित्र पठनात तन्मय; विद्युत रोषणाईने मंदिर सजले
नायक वृत्तसेवा, संगमनेर अमृतवाहिनी प्रवरा आणि म्हाळुंगी संगमावर वसलेल्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून अखंड साई चरित्र पारायणाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या पारायणाला दोनशे साई भक्त बसले असून ते चरित्र पठणात तन्मय झाले आहेत.

येथील साई मंदिरात गुरु पौर्णिमा उत्सव ३ जुलै ते १० जुलै दरम्यान होणार असून गुरुवार दि. १० जुलैला गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साईचरित्र पारायणाची व्यवस्था श्रीसाई मंदिरात केली आहे. श्रीसाईचरित्र पारायण करणाऱ्या साई भक्तांस श्रीसाईबाबांची छानशी प्रतिमा व एक साईचरित्र बाबांचा प्रसाद म्हणून भेट मिळेल. इच्छुक श्रीसाई भक्तांनी पारायण सोहळ्यात सहभागी होवून साई भक्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.३ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजेपासून अखंड श्रीसाईचरित्र पारायण सोहळ्याची सुरुवात होईल. पारायण सोहळा पूर्ण सात दिवस चालणार आहे. गुरुवार दि. १० जुलै या गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ५ वाजता श्री साईबाबांना लघुरुद्रभिषेक होईल.सकाळी ६ ते ७ पर्यंत श्री साईचरित्र पारायणाचे समाप्तीच्या ५३ व्या अध्यायाचे वाचन होईल. ७ ते ७.३० श्री साईबाबांची आरती होईल. ८ ते ९.३० साई मंदिर ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत संत भेट पालखी सोहळा.श्रीसाईबाबांनी हातळलेला शेला पालखीत ठेवला जाईल.सामुदयिक श्रीसत्यनारायण महापूजा होईल. दुपारी १२ वाजता श्रीसाई बाबांची आरती होईल व तद्नंतर महाप्रसाद (भंडारा) होईल. बुधवार दि. ९ जुलै रोजी सायं. ८ ते १० पर्यंत साईभजन संध्या हा कार्यक्रम होईल.अशी माहिती व्यवस्थापक मंडळ, साई मंदिर अध्यक्ष जसपाल डंग ओम साई चॅरिटेबल ट्रस्ट यांनी दिली. संगमनेर ते शिर्डी हा एक दिवसीय पायी पालखी सोहळा होणार आहे. या पायी दिंडीचे आयोजन ओम साई ग्रुप संगमनेर यांनी केले आहे. सदर दिंडी साई मंदिर, संगमनेर येथून सोमवार दि. २१ जुलै श सकाळी ६.३० वाजता निघेल.

३ जुलै रोजी सकाळी साई चरित्र ग्रंथ पारायणाची संकल्प पूजा प्रसाद सुतार, पूजा सुतार या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. सदर पारायण आठ दिवस चालणार असून यावेळी साईंची महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात आले.

Visits: 156 Today: 3 Total: 1106437
