विविध संतांच्या वेशभूषेत बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. या दिंडीमध्ये विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत निवृत्तीनाथ, संत सोपान, संत मुक्ताबाई यांच्या वेशात बालचमुंनी सहभाग घेत दिंडीचा आनंद लुटला.

यावेळी विठ्ठल -रुख्मिणीच्या प्रतिमेचे पालखी पूजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाच्या गजरात डोक्यावर तुलसी कलश व रोपटे घेत भजनी मंडळाच्या साथीने ग्रामप्रदक्षिणा पूर्ण केली. या दरम्यान दोन ठिकाणी गोल रिंगणही केले. यावेळी शाळेतील बाल वारकऱ्यांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.

यावेळी वडगाव पान केंद्राच्या केंद्रप्रमुख आशा घुले, उपसरपंच सोमनाथ थिटमे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे,उपाध्यक्ष संदीप खैरे, रघुनाथ गवांदे, संदेश कडलग, मारुती कोल्हे, कृष्णा गवांदे,गोवर्धन गवांदे, किरण थिटमे, कैलास आव्हाड,बाळासाहेब गवांदे,राजू घुले, अंगणवाडी सेविका जयश्री घुले, वैशाली घुले, संजीवनी मिसाळ यांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दिंडीदरम्यान भजनी मंडळाने वारीतील ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग गायिले. सर्व बाल वारकऱ्यांनी त्यांना साथ दिली. वृक्ष-मित्र पुरस्काराने ४२ विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दिंडीच्या समारोप प्रसंगी ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत उपस्थित माता पालकांना मान्यवरांच्या हस्ते रोपांचे वितरण करण्यात आले.दीपक दये, सोमनाथ थिटमे, सचिन आगळे यांनी बालवारकऱ्यांना प्रसाद उपलब्ध करून दिला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक शिवाजी नरवडे,सुरेश साळुंके, शकुंतला शेळके, दस्तगीर शेख, सखाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, सोनाली बागुल, सोमनाथ मदने आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Visits: 152 Today: 2 Total: 1109247
