संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजय फटांगरे


नायक वृत्तसेवा, संगमनेर 
संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय नारायण फटांगरे यांची  निवड करण्यात आली आहे. तर कोपरगाव ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी नितीन मनोहर शिंदे यांची आणि भिंगारच्या तालुकाध्यक्षपदी रिजवान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली अजय फटांगरे यांनी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळताना तालुक्यात युवकांचे मोठे संघटन उभे केले होते. याचबरोबर बोटा गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापतीपद त्यांनी सांभाळले.

बोटा गटामध्ये गावोगावी सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या. तालुक्यातही त्यांचा जनसंपर्क कायम चांगला राहिला. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली २६ जून २०२५ रोजी झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीत त्यांना देण्यात आले. त्यांच्या समवेत कोपरगाव ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी नितीन मनोहर शिंदे यांची तर भिंगारच्या अध्यक्षपदी रिजवान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे  माजी प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, दुर्गा तांबे,युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्री थोरात, बाजीराव खेमनर, ॲड. माधव कानवडे, रणजितसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, संपत डोंगरे सुधाकर जोशी,शंकर खेमनर, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, पांडुरंग  घुले, बाबा ओहोळ,  मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे,विश्वास मुर्तडक, निखिल पापडेजा, सुरेश झावरे, अर्चना बालोडे, प्रमिला अभंग, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, गौरव डोंगरे , हैदर अली, जावेद शेख, यांच्यासह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व काँग्रेसच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

 माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्यावर कायम विश्वास ठेवला असून मोठी संधी दिली आहे. आपण अत्यंत प्रामाणिकपणे ही जबाबदारी पार पडणार असून काँग्रेस हा राज्यघटना व देशहिताचा विचार आहे. युवक या विचारापासून  दुरावले असून त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून काँग्रेसला अधिक बळकट करण्यासाठी यापुढील काळामध्ये माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली अधिक सक्रियतेने जोमाने काम करून तालुक्यात व जिल्ह्यात पुन्हा काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांकावर नेऊ अशी भावना नवनियुक्त अध्यक्ष अजय फटांगरे यांनी व्यक्त केली आहे.

Visits: 156 Today: 1 Total: 1419409

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *