‘शिवराष्ट्र हायकर्स’ च्या ‘ पन्हाळगड-पावनखिंड मोहिमेला उदंड प्रतिसाद

नायक वृत्तसेवा,  संगमनेर
 ‘शिवराष्ट्र हायकर्स महाराष्ट्र’  आयोजित ‘पन्हाळगड ते पावनखिंड’  या महत्वाकांक्षी ३३ व्या देशव्यापी साहस मोहिमेसाठी महाराष्ट्रातून  प्रतिसाद मिळत आहे, तसाच पर राज्यातून सुद्धा अनेक शिवभक्त या पावनखिंडीच्या धारातीर्थावर नतमस्तक होण्यासाठी येत असतात. 
१२ जुलै हा नरवीर शिवा काशीद  आणि १३ जुलै हा नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा ‘धारातीर्थी स्मृतिदिन’ असल्याने या वर्षी १२ ते १४ जुलै दरम्यान ही मोहीम होणार आहे. या मोहिमेत खा. श्रीकांत शिंदे, उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे,  पानिपतकार विश्वास पाटील,नरवीर रायाजी बांदल यांचे वंशज अनिकेत बांदल, सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजीत जेधे,  सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज रायबा मालुसरे, सरदार पिलाजी सणस यांचे वंशज बाळासाहेब सणस सहभागी होणार आहेत.
या मोहिमेत खोतवाडी मुक्कामी शिवव्याख्याते प्रा. दिपक कर्पे  आणि पावनखिंडीत इतिहास अभ्यासक भूपाल शेळके यांची इतिहास जागृत करणारी व्याख्याने होणार आहेत. तसेच पावनखिंडीच्या वाटेवरील खोतवाडी मुक्कामी शिवराष्ट्र निर्मित  ‘पावनखिंड’ हा लघुपट एल इ डी स्क्रीनवर दाखवला जाणार आहे.
संगमनेर आणि परिसरातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुमारे ऐंशी ते नव्वद  शिवभक्त या साहस मोहिमेत धारातीर्थ पूजनासाठी उपस्थित राहणार असल्याचे  शिवव्याख्याते दिपक कर्पे, सुखदेव इल्हे, संतोष शेळके, डॉ.महादेव अरगडे, नंदकिशोर रहाणे, सोमनाथ मदने, विलास शिरोळे  आणि राज्याध्यक्ष प्रशांत साळोखे यांनी सांगितले.
Visits: 228 Today: 2 Total: 1959439

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *