आई-वडील व शिक्षण संस्था यांना विसरू नका : माने

नायक वृत्तसेवा, अकोले 
आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही मोठ्या पगाराची नोकरी,  व्यवसाय करा, पण या यशामागील खरे मानकरी असलेले आई-वडील, जिथे शिक्षण घेतले त्या शिक्षण संस्थेला कधीच विसरू नका असा संदेश करियर मार्गदर्शक घनश्याम माने यांनी दिला. ते विरगाव येथील मातोश्री राधा फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थी निरोप समारंभात बोलत होते.
 व्यासपीठावर आनंदगड शैक्षणिक संकुलाचे सचिव डॉ. अनिल रहाणे, संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व केमिस्ट आरीफ तांबोळी, केमिस्ट असोसिएशनचे जिल्हा सचिव सचिन शिंदे, सदस्य केरू वाकचौरे, विवेकानंद पतसंस्थेचे संचालक अनिल डोळस, निलेश वाकचौरे, शिवराज वाकचौरे, प्राचार्या डॉ. पल्लवी फलके, प्रा. प्रतीक्षा रहाणे, भिलारे उपस्थित होते.
यावेळी अनिल रहाणे, प्राचार्या डॉ. पल्लवी फलके, प्रा.मनिषा शेरमाळे, प्रा.प्रवीण शेळके, प्रा.कनकधर अभिलाष, प्रा. वैभव गाढवे, प्रा.कल्याणी म्हैसमाळे, प्रिया आंबरे यांची भाषणे झाली. यावेळी प्रा.मयुरी मुंढे, काजल धुमाळ,प्रा.आकाश इंद्रेकर,प्रा.सोनाली भांगरे,उर्मिला मिंढे, विद्या वाकचौरे,  रोहिणी निकम,सुधीर गांडोळे,राहुल तोरमल, कामिनी देशमुख, आगिवले आदी
उपस्थित होते. प्रास्तविक प्रा. रेश्मा आढळ यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.ऋतुजा भांगरे यांनी केले.
Visits: 235 Today: 1 Total: 2127885

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *