कोंभाळणेतील जळीतग्रस्त कुटुंबियांना गायकरांकडून मदत
![]()
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोंभाळणे येथे झालेल्या जळीत कांडातील कुटुंबियांची जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर यांनी नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी जळीतग्रस्त कुटुंबियांना 21 हजार रुपयांची रोख रक्कम देऊन मदत केली.

चार दिवसांपूर्वी कोंभाळणे येथे लागलेल्या आगीत गावंडे, पथवे, मेंगाळ यांच्या घराची आगीत राखरांगोळी झाली. यामध्ये फक्त अंगावरची कपडे शिल्लक राहिली. त्यांचा सर्व संसार जळून भस्मसात झाल्याने या गरीब आदिवासी कुटुंबांना आपले काहीतरी देणे लागते या उदात्त हेतूने सीताराम गायकर व त्यांच्या सहकार्यांनी कोंभाळणे येथे जावून जळीतग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी तब्बल महिनाभर पुरेल इतका किराणा बाजार व 21 हजार रुपयांची रोख रक्कम त्यांनी सुपूर्द केली. या कुटुंबांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. घराच्या शेडसाठी अगस्ति साखर कारखान्याच्यावतीने देखील मदत केली जाईल, असे आश्वासन गायकर यांनी दिले. यावेळी अगस्तिचे ज्येष्ठ संचालक अशोक देशमुख, प्रकाश मालुंजकर, बाळासाहेब ताजणे, महेश नवले, प्रताप देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, भागवत शेटे, नीलेश गायकर, सचिन दराडे, दिलीप मंडलिक, पोपट दराडे, सुभाष बेनके आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
