‘प्रवराकाठ’ मुलांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन इंदोरी शाळेचा उपक्रम; बालकवींची अभिव्यक्ती पुस्तक रूपात

नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्हा परिषदेच्या इंदोरी शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी लिहिलेल्या कवितांचा ‘प्रवराकाठ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र दिनी करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. के. नवले, उपसरपंच वैभव नवले, विकास देशमुख, केंद्रप्रमुख सोना लहामटे, शीतल बिबवे, सविता मेहेत्रे, अशोक नवले, लक्ष्मण नवले, पांडुरंग नवले, कैलास देशमुख, डॉ. गणेश नवले, शिवाजी हासे, संपत नवले, चंद्रकांत नेहे आदी मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या मुलांनी तयार केलेल्या कवितांचे पुस्तक करणे हा शाळेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. कवितासंग्रहामध्ये चिमुकल्यांची अभिव्यक्ती वाचायला मिळते. मुलांनी शाळा शेती पाऊस आजी फुले पतंग ससा शेतकरी अशा विविध विषयांवर चांगल्या कविता केल्या असल्याचे के. के. नवले म्हणाले. केंद्रप्रमुख लहामटे यांनीही शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत बालकवींना शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर यांची या कवितासंग्रहाला प्रस्तावना लाभली आहे. यावेळी बालकवींनी स्वतः तयार केलेली कविता उत्कृष्टपणे सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून सहाय्यक जलसंपदा अधिकारी म्हणून निवड झालेल्या अक्षय देशमुख यांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य गणेश नवले, मनीषा ठोंबाडे, वर्षा शिरसाठ, ग्रामसेवक संजय पथवे, पत्रकार प्रवीण धुमाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे रवींद्र देशमुख, सतीश नवले, शिवाजी ठोंबाडे, गौरी नवले, संपदा नवले, सखुबाई देशमुख, सुजाता ठोंबाडे, विजय चौधरी, किसन नवले, सुप्रिया पावसे, शशीकला नन्नवरे, सीताराम थोरात, आशा कोल्हाळ, सारिका वामन, संगीता नवले आदिंसह ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका संगीता बोर्डे यांनी केले. सूत्रसंचालन चौथीच्या विद्यार्थिनी समृद्धी आरोटे व सानिध्या पावसे यांनी तर आभार सविता जोरवर यांनी मानले.

भाषा विकासात मुलांच्या कानावर समृद्ध भाषा पडणं महत्त्वाचं असंत. तसचं लेखनासाठी त्यांना पोषक वातावरण वातावरण मिळणंही महत्त्वाचं असतं म्हणून शाळेने मुलांना ‘प्रवराकाठ’च्या निमित्ताने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. बालकवींच्या सहज लेखनाचे दर्शन या कवितासंग्रहातून घडेल.
– भाऊसाहेब कासार (सहाय्यक शिक्षक)
