महसूल मंत्री शतायुषी होण्यासाठी धांदरफळमध्ये रक्तदान शिबिर
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. त्यानुसारच महसूल मंत्री थोरात शतायुषी होण्यासाठी 101 रक्त पिशव्यांचा जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी केलेला संकल्प प्रत्यक्ष साकार झाला आहे. तब्बल 115 दात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कर्तव्य निभावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
जिल्हा परिषद धांदरफळ गटातील सर्व कार्यकर्ते व तरुण मित्रमंडळाच्यावतीने धांदरफळ बुद्रुकमध्ये स्वदेश सेवाभावी संस्थेच्या सहयोगातून रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याकामी अर्पण ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. सर्व रोग निदान तपासणी शिबिरांतर्गत डॉ.प्रदीप कुटे, डॉ.अमेय देशमुख, डॉ.आनंद पोफळे, डॉ.संतोष मतकर, डॉ.रेखा मतकर गरजू रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचारांसाठी प्रदीप मेडिकलचे संचालक सुनील गागरे यांनी मदत केली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, स्वदेश उद्योग समूहाचे संचालक बाळासाहेब देशमाने, पांडुरंग घुले, चांगदेव खेमनर, संपत डोंगरे,, विष्णूपंत रहाटळ, विनोद हासे, अनिल देशमुख, अनिल काळे, सरपंच भानुदास शेटे, रामनाथ डोंगरे, नवनाथ कातोरे, अरूण गुंजाळ, शरद कोकणे, गोरख डोंगरे, सुभाष कर्पे, संगम आहेर, संदीप कर्पे, अनिल घुले, ज्ञानेश्वर क्षीरसागर, पंडीत कातोरे, अविनाश रोकडे, सोनाली शिंदे, रामनाथ कवडे, नानासाहेब वाकचौरे, स्वदेश युवा प्रतिष्ठानचे नवनाथ देशमाने, योगेश देशमुख, व्यंकटेश देशमुख, विजय कोल्हे, सुनील देशमुख, रोहित वाकचौरे, भिकाजी काळे, नवनाथ नाईकवाडी, सुरेश खुरपे, तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी काळे यांसह पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक दत्ता कासार यांनी तर आभार प्रदर्शन कारखान्याचे संचालक अनिल काळे यांनी केले.