घुलेवाडीतील ‘युवा ग्रुप’चे ग्रामस्वच्छता अभियान! स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करत केले सुशोभीकरण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील घुलेवाडी येथे ‘युवा ग्रुप’च्या सदस्यांनी एकत्र येत नुकतेच ग्रामस्वच्छता अभियान राबवले आहे. कोरोना काळापासून मोठ्या प्रमाणात झालेली अस्वच्छता तरुणांनी दूर करत आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

घुलेवाडीतील युवा ग्रुप नेहमीच सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेत असतो. कोरोना महामारीमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने युवा शक्तिने एकत्र येऊन गावातील स्मशानभूमीची स्वच्छता केली. केर कचरा, प्लास्टिक व पालापाचोला गोळा करुन संपूर्ण परिसर चकचकीत केला. तसेच झाडांनाही रंग देत सुशोभीकरण केले. तरुणांच्या या उपक्रमाने एकीचे बळ झाले की कोणतेही काम अशक्य नसल्याचे सिद्ध केले. सर्वजण गट-तट, पक्ष, जात-पात विसरुन एकदिलाने एकत्र येऊन गावाच्या विकासाठी लढत असल्याचे अधोरेखित केले. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असून, इतर गावांनाही आदर्श निर्माण केला आहे.

यापुढेही असेच सामाजिक उपक्रम घुलेवाडी गावात राबविणार असल्याचा मनोदय ग्रुपचे सदस्य तथा किसान युवा क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सीताराम पानसरे यांनी व्यक्त केला. या उपक्रमामध्ये ग्रुपचे मार्गदर्शक सतीश भेंडाळे, सुनील राऊत, नवनाथ राऊत, विलास राऊत, युवराज सातपुते, संजय खर्डे, राजेंद्र राऊत, सुभाष राऊत, संतोष राऊत, प्रदीप ढमाले, विकास राऊत, भानुदास मुळे, संजय राऊत, अमोल आगलावे, विशाल फटांगरे, साहिल राऊत, विशाल वालझाडे, अजित अभेयकर आदिंनी सहभाग घेतला होता.

Visits: 22 Today: 1 Total: 115313

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *