संगमनेरात जगनाडे महाराजांची जयंती उत्साहात साजरी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज यांची 396 वी जयंती संगमनेर शहर तेली समाज व जय संताजी महिला मंडळ यांच्यावतीने मोठ्या उत्साहात मंगळवारी (ता.8) साजरी करण्यात आली.

यावेळी तेली महिला आघाडी उत्तर नगर जिल्हाध्यक्षा शारदा कर्पे आणि जय संताजी महिला मंडळ संगमनेरच्या अध्यक्षा सुवर्णा कर्पे यांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी सुनीता कर्पे, तारकेश्वरी वालझाडे, रंजना शिंदे, सोनाली वालझाडे, नीलिमा कर्पे, योगिता वालझाडे, स्नेहल वालझाडे, मनीषा पाबळकर, भारती वालझाडे, कावेरी राहातेकर, रूपाली वालझाडे, कल्पना वालझाडे, अरुणा साळुंखे, रिना वालझाडे, दीप्ती पेंडभाजे, प्रमिला वालझाडे, छाया दुर्गुडे, वैष्णवी दुर्गुडे, जयश्री वालझाडे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Visits: 108 Today: 1 Total: 1111225

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *