संगमनेर पोलिसांमुळे 39 गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता
संगमनेर पोलिसांमुळे 39 गोवंश जनावरांची कत्तलीपासून मुक्तता
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या 39 गोवंश जनावरांची शहर पोलिसांनी जीवदान देत मुक्तता केली आहे. शनिवारी (ता.22) रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील जमजम कॉलनी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी रविवारी (ता.23) एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल वाहिद अब्दुल करीम कुरेशी (रा.भारतनगर, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलीस शिपाई सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं.1665/2020 भादंवि कलम 429, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम 5(अ),1,9 सह.प्रा.नि.वा.प्र.का.क.3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी ही कारवाई केली आहे. 9 लाख 75 हजार रुपयांच्या सुटका केलेल्या 39 जनावरांना पोलिसांनी गोशाळेत पाठवले आहे.

