आ.ओगले यांच्या प्रयत्नातून श्रीरामपूर-मुंबई बससेवा पूर्ववत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अनेक दिवसांपासून बंद असलेली श्रीरामपूर-मुंबई बससेवा पूर्ववत झाली असून, यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. श्रीरामपूर-मुंबई बस सेवा सुरू करण्यासाठी अनेक प्रवाशी व व्यापाऱ्यांनी आ. हेमंत ओगले यांना निवेदन देऊन मागणी केली होती. त्यावर आ. हेमंत ओगले यांनी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना देत तातडीने श्रीरामपूर-मुंबई बस सेवा चालू करण्याची सूचना केली.

त्यानुसार, ६ ऑक्टोबर रोजी रात्री श्रीरामपूर-मुंबई बससेवा चालू झाली. यावेळी आ. ओगले यांच्यासह युवा नेते करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, पंडित बोंबले, नीलेश नागले, रियाज पठाण, मुक्तार शहा, प्रीतम बोरावके आदी उपस्थित होते. श्रीरामपूर-मुंबई बस सेवा पूर्ववत चालू झाल्याने प्रवाशी व व्यापारी यांनी आ. हेमंत ओगले यांना धन्यवाद दिले आहे.

गेल्या महिन्यात आ. ओगले यांच्या प्रयत्नाने श्रीरामपूर बस डेपोला दहा नव्याने बस गाड्या मिळाल्या होत्या. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे आ. हेमंत ओगले यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुंबई येथे जाण्या येण्यासाठी श्रीरामपूर, बेलापूरमधील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना या बसचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

Visits: 23 Today: 1 Total: 1109448
