दोघांची हवालदार तर सहा जणांची पोलीस नाईकपदी बढती
नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्हा पोलीस दलातील अनेक कर्मचार्यांची नुकतीच पदोन्नती झाली आहे. यामध्ये अकोले पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले दोन पोलीस नाईक यांची हवालदारपदी तर सहा पोलीस शिपायांची पोलीस नाईकपदी बढती झाली आहे. नुकताच सहा. पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी बढती झालेल्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
सदर पदोन्नतीमध्ये पोलीस नाईक असलेले बी. बी. गोंधे व महिला पोलीस नाईक गोणके यांची हवालदारपदी तर पोलीस शिपाई असलेले आर. एम. लहामगे, आर. एस. वलवे, एस. जी. पवार, व्ही. एम. शेरमाळे, महिला पोलीस एस. एम. आहेर आणि एस. एम. पटेकर यांची पोलीस नाईकपदी बढती झाली आहे. अकोले तालुक्यात अकोले व राजूर अशी दोन पोलीस ठाणे कार्यरत आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या तालुक्याची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कमी मनुष्यबळावर कसोटी लागते. त्यामुळे पदोन्नती झालेल्या कर्मचार्यांना अधिक ऊर्जेने काम करण्यास प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे.