‘मुळा’तून सुरू असलेल्या विसर्गात वाढ
‘मुळा’तून सुरू असलेल्या विसर्गात वाढ
नायक वृत्तसेवा, राहुरी
नगर व पारनेर तालुक्यातून पाण्याची आवक वाढल्याने मुळा धरणाच्या अकरा मोर्यांतून नदीपात्रात सुरू असलेल्या विसर्गात मंगळवारी (ता.8) दुपारी वाढ करण्यात आली आहे.

मुळा धरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर 1 सप्टेंबरपासून धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. 1 ते 8 सप्टेंबरपर्यंत धरणातून 1200 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग झाला आहे. मंगळवारी सकाळी 3 हजार क्युसेकने सुरू असलेला विसर्ग दुपारी 1 वाजता 4 हजार क्युसेक करण्यात आला. धरणाच्या उजव्या कालव्यातून 550 क्युसेक, तर डाव्या कालव्यातून 150 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी 525 दशलक्ष घनफूट, तर डाव्या कालव्यातून मुसळवाडीसाठी 75 दशलक्ष घनफूट पाणी आजपर्यंत सोडण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा 25 हजार 444 दशलक्ष घनफूट ठेवून कोतूळ, नगर व पारनेर या भागात बरसलेल्या पावसाच्या पाण्याचा मुळा नदीपात्रासह उजव्या व डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी विसर्ग सुरू आहे.

