कोविडने दिला संगमनेरकरांना काहीसा दिलासा! रोजच्या रुग्णवाढीत निम्म्याने घट होवून आज केवळ पंचवीस रुग्णांची भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या रुग्णसंख्येसह दे धक्का करणाऱ्या कोविडच्या विषाणूंनी आज मात्र संगमनेरकरांना काहीसा दिलासा दिला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून दररोज सरासरी 52 च्या गतीने धावणाऱ्या कोरोना संक्रमणाचा वेग आज निम्म्याने घटला. शासकीय व खासगी प्रयोगशाळेसह रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज केवळ 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजही एकूण रुग्णसंख्येत शहरातील फक्त सात रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याच्या बाधित संख्येने 23 व्या शतकाच्या दिशेने एक पाऊल टाकीत 2 हजार 266 रुग्णसंख्या गाठली आहे.

गेल्या 26 ऑगस्टपासून तालुक्यातील कोविडच्या धावगतीने अचानक गिअर बदलल्याने दररोज सायंकाळी प्राप्त होणार्‍या तपासणी अहवालातून संगमनेरकरांना धक्के बसत आहेत. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण समोर येत असल्याने तालुक्याच्या बाधितांनी यापूर्वीच 22 शतके ओलांडून तेविसाव्या शतकाच्या दिशेने आगेकूच केली होती. त्यात आज 25 रुग्णांची भर पडल्याने संगमनेर तालुका आता जिल्ह्यातील दुसर्‍या स्थानासह तेवीसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर येवून थांबला आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून अकरा, खासगी प्रयोगशाळेकडून सहा, तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शहरातील केवळ सात जणांचा समावेश आहे. शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावरील 34 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण व नऊ वर्षीय बालक, रंगार गल्लीतील 42 व 22 वर्षीय महिला व चैतन्यनगर परिसरातील 32 वर्षीय तरुण संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.

त्यासोबतच, तळेगाव दिघे येथील 70 वर्षीय इसमासह 65 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 46 वर्षीय तरुण व आश्वी खुर्द येथील 55 वर्षीय महिला, तसेच खासगी प्रयोगशाळेच्या अहवालातून घुलेवाडीतील 49 व 37 वर्षीय इसमासह 48 व तीस वर्षीय महिला, 10 वर्षीय बालक व सहा वर्षीय बालिका, गुंजाळवाडी येथील 57 वर्षीय इसम, धांदरफळ खुर्द मधील 53 वर्षीय महिला, घारगाव येथील 48 वर्षीय इसम, कवठे कमळेश्वर येथील 26 वर्षीय तरुण, कासारा दुमाला येथील 40 वर्षीय तरुण, मंगळापुर येथील 67 वर्षीय इसमासह 55 वर्षीय महिला व चिखलीतील 50 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरूवारच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या जवळपास सत्तर टक्क्यांहून कमी आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर संगमनेरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आजच्या रूग्णसंख्येने संगमनेर तालुक्यातील बाधितांचा आकडा 2 हजार 266 वर नेऊन पोचवला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत दैनिक नायकच्या माहितीनुसार 34 जणांचा मृत्यू झाला आहे, तर शासकीय नोंदीनुसार आज अखेर केवळ एकतीस मृतांची नोंद झाली आहे. 

गेल्या एप्रिलपासून सुरु झालेल्या कोविडच्या संक्रमणावर एका नजरेत दृष्टीक्षेप टाकल्यास एप्रिलमध्ये ग्रामीणभागातील एकासह आठ रुग्ण, मे महिन्यात पाच जणांच्या मृत्युसह ग्रामीण रुग्णसंख्येत 21 तर शहरी रुग्णसंख्येत 15 रुग्णांची वाढ, जूनमध्ये सहा जणांच्या मृत्युसह ग्रामीणभागातील 23 तर शहरी भागातील 42 जणांना संक्रमण, जुलैमध्ये सात जणांच्या मृत्युसोबतच ग्रामीणभागात 381 तर शहरीभागात 269 रुग्णांची वाढ, ऑगस्टमध्ये सात मृत्युसह ग्रामीणभागात 603 तर शहरीभागात 358 रुग्णांची भर व चालु महिन्यातील अवघ्या दहा दिवसांतच आठ जणांच्या मृत्युसह तालुक्याच्या ग्रामीणभागातील 127 गावांमध्ये प्रादुर्भाव पसरण्यासोबतच ग्रामीण रुग्णसंख्येत 424 तर शहरी रुग्णसंख्येत 97 अशा सरासरी प्रती दिवस 52 रुग्ण या दराने संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत तब्बल 521 रुग्णांची भर पडली आहे. रुग्णवाढीचा हा वेग कायम राहील्यास या महिन्यात रुग्णवाढीचे तिसरे सहस्रकही मागे सुटण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ८३.७९ टक्के इतके आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ३३९ इतकी आहे.

आज जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेकडून १७३, खाजगी प्रयोगशाळेकडून ४३८ व रॅपिड अँटीजेन चाचणीतून जिल्ह्यात २४५ रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्हा प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील २९, राहता १८, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण २०, अहमदनगरचा लष्करी परिसर ०३, नेवासा २३, पारनेर ०१, अकोले २०, राहुरी ०१, शेवगाव ०५, कोपरगाव १२, जामखेड १८, लष्करी रुग्णालय ०८ येथील रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत अहमदनगर महापालिका क्षेत्रातील १६०, राहाता ४१, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ३६, श्रीरामपुर ६४, अहमदनगरचा लष्करी परिसर ०७, नेवासा १६, श्रीगोंदा ०४, पारनेर १८, अकोले ०५, राहुरी ४१, शेवगाव ०३, कोपरगांव ०९, जामखेड ०२ आणि कर्जत येथील ०१ रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीतून आज अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ४२, राहाता ४८, नगर ग्रामीण १०, श्रीरामपूर २८, नेवासा १७, श्रीगोंदा १०, पारनेर ०७, अकोले २०, राहुरी ०३, कोपरगाव ०९, जामखेड १६ आणि कर्जत येथील २६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील 581 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज..
अहमदनगरचे महापालिका क्षेत्र १२४, संगमनेर ६८, राहाता ४६, पाथर्डी ४६, नगर ग्रामीण ०८, श्रीरामपूर ३८, लष्करी परिसर १०, नेवासा ४७, श्रीगोंदा ४०, पारनेर २२, अकोले ०६, राहुरी २४, शेवगाव १७, कोपरगाव ३३, जामखेड २१, कर्जत १७, लष्कर रुग्णालय ०९ आणि अन्य जिल्ह्यातील ०५ रुग्णांना आज उपचार पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले.

  • जिल्ह्यातील बरे झालेली रुग्ण संख्या : २४ हजार ७३१
  • जिल्ह्यात उपचार सुरू असलेले एकूण रूग्ण : ४ हजार ३३९
  • जिल्ह्यातील एकूण कोविंड मृत्यू : ४४४
  • जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या : २९ हजार ५१४
  • जिल्ह्यातील ५८१ रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज..
  • जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.७९ टक्के..
  • जिल्ह्यात आज नव्या ८५६ रुग्णांची पडली भर..

Visits: 81 Today: 1 Total: 417493

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *