शेवगावमध्ये घंटागाडी अडवत महिलांचे आंदोलन

शेवगावमध्ये घंटागाडी अडवत महिलांचे आंदोलन
नायक वृत्तसेवा, शेवगाव
शहरात महिलांनी नुकतीच घंटागाडी अडवत दोन तास आंदोलन केले. नगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या कचरा संकलनासाठी येतात त्यांची उंची जास्त असल्याने कचरा टाकण्यासाठी महिलांना त्रास होत असल्याने हे आंदोलन करण्यात आले.


शेवगाव शहरातील कचरा संकलनाचे काम सध्या नगरपालिकेकडे आहे. त्यासाठी सात घंटागाड्या आहेत. या गाड्यांची बांधणी करताना त्यांची उंची प्रमाणापेक्षा अधिक वाढविण्यात आली आहे. त्यामुळे त्यात कचरा टाकण्यासाठी नागरिकांना व महिलांना मोठी कसरत करावी लागते. अनेकवेळा तर ओट्यांचा किंवा उंच जागेचा वापर करून कचरा त्यात कचरा टाकावा लागतो. मात्र गल्लीत गाडी आल्यानंतर अशी उंच जागा उपलब्ध नसल्यास तो कचरा गाडीतील कचराकुंडीत न जाता काही रस्त्यावर तर काही टाकणार्‍या महिलांच्या अंगावर पडतो. त्यामुळे गाडीत कचरा टाकणे मोठी जिकिरीची बाब बनली आहे. त्यात स्वच्छता कर्मचार्‍यांकडे सुरक्षाविषयक साधने उपलब्ध नसल्याने ते हातात कचरा घेऊन गाडीत टाकण्यास धजावत नाहीत. त्यामुळे अनेकदा महिलांसह नागरिकांबरोबर वादाचे प्रसंग घडतात. याच कारणास्तव महिलांनी आंदोलन करत पालिकेचे लक्ष वेधले आहे.

Visits: 10 Today: 1 Total: 116470

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *