आश्वीमध्ये पोलिसांचे पथ संचलन
आश्वीमध्ये पोलिसांचे पथ संचलन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.27) आश्वी बूद्रूक येथे पोलिसांनी पथ संचलन केले. आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन करण्यात आले.

यावेळी राज्य राखीव दलाच्या दंगा नियंत्रण पथक तुकडीला पाचारण करण्यात आले. गणेश विसर्जनाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी हे पथ संचलन करण्यात आले. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील, गोपनीय विभागाचे अनिल शेंगाळे, पोलीस नाईक शिरसाठ, पोलीस शिपाई धिंदळे, विनोद गंभीरे, प्रवीण रणधीर, साठे आदिंसह पोलीस कर्मचारी सहभागी होते.

Visits: 228 Today: 4 Total: 1102937
