राजूर गाव गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय

राजूर गाव गुरुवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
नायक वृत्तसेवा, अकोले
सलग दोन दिवसांत राजूरमध्ये 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून राजूर ग्रामपंचायतीने गुरुवारपर्यंत (ता.10) सलग पाच दिवस राजूर गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सरपंच गणपत देशमुख यांनी दिली.


शुक्रवारी राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या रॅपिड अ‍ॅन्टीजेन टेस्टमध्ये तीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यानंतर शनिवारी झालेल्या टेस्टमध्येही 18 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.दिघे यांनी सांगितले. दोन दिवसांत राजूरमध्ये एकूण 21 व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येथील स्थानिक प्रशासनाने रविवारी (ता.6) सलग पाच दिवस राजूर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच देशमुख यांनी सांगितले.

Visits: 64 Today: 1 Total: 438076

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *