संगमनेर तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक’

संगमनेर तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींवर ‘प्रशासक’
नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांची 31 ऑगस्ट अखेर मुदत संपली आहे. वरील सर्वच ग्रामपंचायतींवर आता ‘प्रशासक’ नेमण्यात आले असून, ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा नव्याने निवडणुका होईपर्यंत सरपंच ऐवजी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली चालणार आहे. त्यामुळे विद्यमान सरपंचासह सर्वजण फक्त नामधारी राहणार असल्याने त्यांना ग्रापंचायत कारभारात कुठलीही लुडबुड करता येणार नाही हे मात्र तितकेच खरे आहे.


संगमनेर तालुक्यात पाच वर्षांपूर्वी ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या; त्या ग्रामपंचायतींची मुदत 31 ऑगस्टला संपली आहे. परंतु सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर असल्यामुळे सर्वच निवडणुका आयोगाने स्थगित केल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींची सत्ता सांभाळणारे सरपंच व सदस्यांचे सर्व अधिकार काढून घेत प्रशासकावर सोपविण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुदत संपलेल्या 34 गावांतील सरपंच आता फक्त नामधारी राहिले आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

प्रशासक नेमलेल्या 34 ग्रामपंचायती…
चिंचपूर, जवळे बाळेश्वर, हिवरगाव पावसा, जवळे कडलग, कर्‍हे, कोंची-मांची, मालदाड, कौठे मलकापूर, कुरकुंडी, मीरपूर, मिर्झापूर, पिंप्रीलौकी, आजमपूर, शिंदोडी, सोनोशी, वरवंडी, तिगाव, पानोडी, वडगाव पान, निमगाव टेंभी, जाखुरी, सावरगाव तळ, सोनेवाडी, आंबी खालसा, चणेगाव, कासारा दुमाला, राजापूर, सावरगाव घुले, वनकुटे, निमगाव बु॥, प्रतापपूर, वडगाव लांडगा, झरेकाठी, पिंपळगाव माथा.

Visits: 66 Today: 1 Total: 437276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *