कोविड सेंटरला मदत देऊन वडीलांचा वाढदिवस साजरा नांदूर खंदरमाळ येथील शिक्षक संतोष टावरेंचा कौतुकास्पद उपक्रम

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील नांदूर खंदरमाळ येथील शिक्षक संतोष मुरलीधर टावरे यांनी वडीलांचा 83 वा वाढदिवस आंबीखालसा व घारगाव या दोन्ही कोविड सेंटर मधील रुग्णांना प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या हस्ते सॅनिटायझर, मास्क व अल्पोपहार देऊन साजरा केला. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नांदूर खंदरमाळ येथील माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक संतोष टावरे यांनी आपले वडील ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर टावरे यांचा दोन वर्षांपूर्वी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने कुटुंबियांनी वडीलांचा वाढदिवस कोविड सेंटरमधील रुग्णांना सॅनिटायझर, मास्क व अल्पोहार देवून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (ता.5) सायंकाळी ते आंबीखालसा येथील कोविड सेंटरमध्ये आले. त्याच दरम्यान प्रांतधिकारी डॉ.शशहकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे हेही आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते रुग्णांना सॅनिटायझर, मास्क व बिस्किट पुड्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर घारगावच्याही कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना वरील साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिक्षक संतोष टावरे यांनी आंबीखालसा कोविड केअर सेंटरला आर्थिक मदत म्हणून अकराशे रुपये दिले. याप्रसंगी आंबीखालसा गावचे सरपंच बाळासाहेब ढोले, उपसरपंच रशीद सय्यद, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गाडेकर, माजी उपसरपंच दत्तात्रय कान्होरे, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, ग्रामसेवक अशोक कडनर, कामगार तलाठी नरवडे, संतोष घाटकर, ईश्वर कान्होरे, आदर्श अंगणवाडी सेविका कविता टावरे आदिंसह कोरोना योद्धे उपस्थित होते.

Visits: 99 Today: 1 Total: 1111122

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *