राज्य लोकसेवा आयोगाच्या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत! तर लॉकडाऊन जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यानंतर काल राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. अहमदनगर शहरातील सत्ताधारी काँग्रेस रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. तर 21 मार्चनंतर होणार्‍या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. या निर्णयानंतर काँग्रेसने निर्णयाचं स्वागत केलं आहे.

याबाबत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी 21 मार्चला परीक्षा घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, त्यांनी म्हटलं आहे की, सर्व प्रकारच्या सरकारी भरतींच्या बाबतीत एक सुनियोजित धोरण व पारदर्शक प्रक्रिया जाहीर करुन संभ्रमावस्था दूर करावी. 21 मार्चच्या परीक्षेला लॉकडाऊन असलेल्या जिल्ह्यातील परीक्षार्थींना विशेष प्रवासाची परवानगी देण्यात यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता 14 मार्च रोजी होणारी परीक्षा 21 मार्च रोजी होणार आहे. नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणार्‍या बाकीच्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *