रांजणगाव देशमुखमध्ये चार जनावरे दगावली

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
अज्ञात आजाराने गुरुवारी (ता.11) कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे आणखी चार जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून आत्तापर्यंत 7 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अज्ञात आजाराने जनावरे दगावली जात आहे. यातच रांजणगाव देशमुख येथील कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकर्‍याच्या चार, दशरथ साहेबराव खालकर यांची एक, संपत लक्ष्मण खालकर यांची एक तर अजून चार जनावरे अत्यावस्थ आहेत. आजारी गायी विषबाधा सदृश्य लक्षणे दाखवत आहेत. ही जनावरे उपचारांना देखील प्रतिसाद देत नाहीत. दरम्यान सोमवारी मृत जनावरांचे शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आला असून त्यात ऑक्झीलेट विषबाधा असल्याची माहिती कोपरगावचे सहाय्यक आयुक्त डॉ.अजयनाथ थोरे यांनी दिली आहे.

Visits: 210 Today: 1 Total: 2062717

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *