निळवंडे प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्तांचे उर्वरित प्रश्न तातडीने सोडवा ः पिचड
निळवंडे प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्तांचे उर्वरित प्रश्न तातडीने सोडवा ः पिचड
धरण तुडूंब भरल्याने साडी, चोळी, श्रीफळ अर्पण करुन केले जलपूजन
नायक वृत्तसेवा, अकोले
माजी मंत्री मधुकर पिचड यांनी ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हे धोरण स्वीकारल्यानेच त्यांच्यावर विश्वास ठेवून निळवंडे धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त शेतकर्यांच्या योगदानातून धरणाची निर्मिती होऊ शकली. निळवंडे हे तालुक्याला लाभलेले वरदान असून प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकर्यांचे उर्वरित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.
निळवंडे धरण भरल्याने नुकतेच प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकरी व माजी आमदार वैभव पिचड यांनी साडी, चोळी, श्रीफळ अर्पण करुन जलपूजन केले. तसेच पिचड यांच्या हस्ते धरणाच्या प्रवेशद्वाराचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना माजी आमदार पिचड म्हणाले, निळवंडे धरण व त्याच्या परिसराचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करीत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूने कठडे, लोखंडी बॅरिकेड्स तातडीने उभे करावेत. पर्यटकांना जाण्या-येण्यासाठी रस्ते चांगले बनवावेत, निळवंडेचे पाणी नदीपात्रात सोडल्याने कोकणेवाडीच्या बाजूने माती पडत आहे त्यामुळे गावाला धोका होऊ शकतो; त्यादृष्टीने कोकणेवाडीच्या बाजूने सिमेंट काँक्रिटकरणाची भिंत बांधावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राष्ट्रवादीमध्ये असताना प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्तांच्या पुनवर्सनाच्या उर्वरित प्रश्नांसाठी अनेक आंदोलने केली. त्यावेळी मात्र निळवंडेचे श्रेय घेणारे गप्प होते, असे परखड टीकास्त्र पिचड यांनी सोडले.
याप्रसंगी विठ्ठल आभाळे, यशवंत आभाळे, राजेंद्र डावरे, मधुकर रामचंद्र पिचड, रामहरी आवारी, अरुण आवारी, मोहन आवारी, रमाकांत आभाळे, दगडू कोकणे, विठ्ठल वंडेकर, बाळासाहेब आभाळे, विठ्ठल वाळके, प्रमोद आभाळे, अरुण गायकर, अनिल वाकचौरे, देविदास कोकणे, बाबू आभाळे, शिवाजी वंडेकर, गंगाराम नलावडे, निवृत्ती मेंगाळ, नामदेव मेंगाळ, भाऊसाहेब मेंगाळ, बबन कातोरे, अशोक कोकणे, दगडू दामोधर कोकणे, भाऊसाहेब भिकाजी आभाळे, शिवदास आभाळे, नवनाथ आभाळे, विष्णू बालचंद आभाळे, पुंजा भगवंत आभाळे संदीप ठका आभाळे, वणीदास गायकवाड, हरिभाऊ पथवे, राजेंद्र बबन डावरे, राजेंद्र बालचंद डावरे, हनुमंत भिकाजी आभाळे आदी उपस्थित होते.