लोटस स्कूलचा पदग्रहण सोहळा उत्साहात

नायक वृत्तसेवा, संगमनेर
के.एम.बी.एस.निघूते मेमोरियल फाउंडेशन संचलित लोटस इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थी परिषद स्थापनेचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.नव्या प्रतिनिधीना त्यांच्या पदांची औपचारिक जबाबदारी या समारंभात सोपवण्यात आली.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट स्वाती विखे तसेच संस्थेचे संस्थापक डॉ. शांताराम निघूते, लोटस स्कूलच्या संचालिका डॉ. नीलिमा निघुते, सीईओ वैशाली निघुते, प्राचार्य प्रतापचंद्र पलेई, उपप्राचार्या सारा रोहम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले.गंगा, गोदावरी ,कृष्ण ,कावेरी ,या चार नद्यांच्या नावाने चार हाऊसला नावे देण्यात आली. स्कूल हेड बॉय म्हणून पवन गव्हाणे व सोहम इम्पाळ, हेड गर्ल म्हणून तेजस्विनी दिघे व प्राची गावित यांची सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने निवड करण्यात आली.

विद्यार्थी परिषदेत प्रमुख प्रतिनिधी, क्रीडा, सांस्कृतिक, विभाग प्रमुख तसेच चार हाऊसचे कॅप्टन यांचा समावेश होता. आर्किटेक्ट स्वाती विखे यांनी विद्यार्थ्यांना परिस्थिती कशीही असो, त्या परिस्थितीमध्ये संयम ठेवून ती परिस्थिती पार पाडली पाहिजे असे सांगितले.लोटस स्कूलच्या अध्यक्षा डॉ. नीलिमा निघूते यांनी विद्यार्थ्यांनी जी जबाबदारी स्वीकारली आहे ती पूर्णपणे पार पाडली पाहिजे. ती जबाबदारी पार पाडताना संयम, प्रोत्साहन,जिद्द आणि प्रामाणिकपणा हे गुण जोपासले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमात गंगा,गोदावरी, कृष्णा,कावेरी, या हाऊस मधील मुलांनी विविध नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Visits: 110 Today: 4 Total: 1100426
