आण्णाभाऊंचे साहित्य परिवर्तनाला दिशा देणारे : गायकवाड

नायक वृत्तसेवा, आश्वी
आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे असुन महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करतांना दिसत असल्याचे प्रतिपादन मोहित गायकवाड यांनी केले.

भारतीय लहुजी सेना, एकता समितीच्या वतीने आण्णाभाऊ साठे यांची ५६ वी पुण्यतिथी संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे साजरी करण्यात आली.
यावेळी मोहित गायकवाड बोलत होते.याप्रसंगी तालुका अध्यक्ष शरद भडकवाड,राज्य सचिव संतोष भडकवाड, ग्रामपंचायत सदस्य संजय भोसले, आकाश भडकवाड,राजेश भडकवाड,सचिन लोखंडे,संतोष बर्डे,बाळासाहेब राक्षे,संजय आव्हाड,मराज पठाण,योगेश राक्षे आदी उपस्थित होते.
Visits: 177 Today: 5 Total: 1111751
