वांग्याच्या रोपात शेतकऱ्याची फसवणूक  कारवाई करण्याची शेतकऱ्याची मागणी

नायक वृत्तसेवा, आश्वी 
नर्सरी मालकाकडे अजय अंकुर या वांग्याच्या रोपाची मागणी केली, मात्र त्याने अजय अंकुर चे रोप न देता मेघना जातीचे रोपे देऊन फसवणूक केल्याची तक्रार राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील शेतकऱ्यांने कृषी अधिकाऱ्यांकडे केली असून संबंधित नर्सरी मालकाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी पाराजी अंत्रे यांनी संगमनेर तालुक्यातील एका गावातील नर्सरीतून ३० एप्रिल २०२५ रोजी अजय अंकुर या वाणाची एक हजार रोपांची मागणी केली. नर्सरी चालकाने अंत्रे यांना एक हजार रोपेही दिले.  सदर रोपांची अंत्रे यांनी  शेतात लागवड केली. दोन अडीच महिन्यांनी जेव्हा प्रत्यक्षात वांगे निघायला सुरवात झाली, त्यावेळी सर्व वांगे  निळे आढळून आले. सदर रोपे त्यांना मेग्ना जातीचे असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांनी सदर नर्सरीच्या मालकाशी फोनवर चर्चा केली.
त्यांनी प्लॉटवर येऊन समक्ष भेट दिली आणि आमच्या कामगारांकडून चुकून अजय अंकुर च्या ऐवजी मेघना जातीची रोपे दिली गेली  असल्याचे सांगितले. याबाबत शेतकरी अंत्रे यांनी नुकसान भरपाई मागितली असता सदर नर्सरी मालकाने आम्ही तुम्हाला वांग्याचेच रोपे दिले आहेत, गांजाचे दिलेले नाही. त्यामुळें भरपाई मिळणार नाही असे सांगितले. याबाबत शेतकरी अंत्रे यांनी नर्सरी चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई  साठी राहुरी कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून  याच्या प्रती  मुख्यमंत्री,कृषिमंत्री, कृषी आयुक्त पुणे तसेच जिल्हा कृषी अधिकारी अहिल्यानगर यांना पाठवण्यात आल्या आहेत.
 या रोपांबाबत माझी  फसवणूक झाली असून रोपांसाठी  खत, मशागत, लागवड,फवारणी,औषधे व इतर साठी हजारो रुपयांचा खर्च झाला आहे. अजय अंकुर च्या वांग्याला चांगला बाजार भाव असून मेघना वांग्यांना अजिबात भाव नसल्याने सदर शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
Visits: 145 Today: 1 Total: 1110607

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *