महाराष्ट्र ठरला पहिल्या राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशीपचा विजेता! ध्रुव ग्लोबल स्कूलने केले राज्याचे नेतृत्त्व; देशभरातील साडेपाचशे स्पर्धकांचा सहभाग..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
भुवनेश्वर येथे पार पडलेल्या पहिल्याच राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशीप स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्पर्धकांनी ‘सुवर्ण’ कामगिरी बजावतांना 69 पदकांसह चॅम्पियनशीपचा खिताबही पटकाविला आहे. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राच्या योगानन खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आपला दबदबा निर्माण करतांना एकूण पदकांमध्ये 44 सुवर्णपदके पटकाविली. तामीळनाडूच्या संघाने दुसरे तर पश्चिम बंगालसह हरियाणाच्या संघाने संयुक्तपणे तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संघाने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठीचा आपला मार्गही प्रशस्त केला आहे. राष्ट्रीय योगासन स्पोर्टस् फेडरेशन व ओडिशा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेतील पारंपरिक योगासनांच्या प्रकारात तृप्ती रमेश डोंगरे (सुवर्ण), स्वराज सनी फिसके (सुवर्ण), आर्यन बिभीषण खरात (रौप्य), स्वरा संदीप गुजर (सुवर्ण), सुमित दिलीप बंडाळे (सुवर्ण), जय संदीप कालेकर (रौप्य), प्रीत निलेश बोरकर (कांस्य) पदकांची कमाई केली. योगासनांच्या कलात्मक प्रकारातही महाराष्ट्र संघाच्या तृप्ती डोंगरे (सुवर्ण), प्रांजल सोमनाथ वन्ना (रौप्य), निबोध अविनाश पाटील (सुवर्ण) व आर्यन खरात (कांस्य), रुद्राक्षी पंकज भावे (सुवर्ण), स्वरा गुजर (रौप्य), मृणाली मोहन बाणाईत (कांस्य), जय कालेकर (सुवर्ण), ओम महेश राजभरने (रौप्य) व प्रीत बोरकर (कांस्य) यांनी पदके मिळविली. कलात्मक श्रेणीतील दुहेरी प्रकारात महाराष्ट्राच्या देवांशी नागराज वाकळे व तृप्ती डोंगरे (सुवर्ण), युगांका किशोर राजम आणि वैदेही रुपेश मयेकर (रौप्य), निबोध पाटील व आर्यन खरात (सुवर्ण), नानक नारायण अभंग व अंश रुपेश मयेकर (रौप्य), रुद्राक्षी भावे व तन्वी भूषण रेडीज् (सुवर्ण), गीता सारंग शिंदे व मृणाली बाणाईत (रौप्य), ओम राजभर व प्रीत बोरकर (सुवर्ण), जय कालेकर व रुपेश मोगलाली सांगे (रौप्य) यांनी पदकाची कमाई केली.

सांगितीक प्रकारातील दुहेरी गटात गीता शिंदे व स्वरा गुजर (सुवर्ण), निबोध पाटील व श्रुमल मोहन बाणाईत (सुवर्ण), नानक अभंग व अंश मयेकर (रौप्य), गीता शिंदे व स्वरा गुजर (सुवर्ण), मृणाली बाणाईत व तन्वी रेडीज् (रौप्य), जय कालेकर व प्रीत बोरकर (सुवर्ण) तर सुमित बंडाळे व रुपेश सांगे यांनी रौप्यपदक पटकाविले. सांघीक सादरीकरणातही कलात्मक श्रेणीतही महाराष्ट्र संघाने सुवर्णपदके मिळविली. संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवणार्‍या महाराष्ट्र संघाने देशभरातील 30 राज्यातील 560 स्पर्धकांमध्ये सुवणर्ध कामगिरी नोंदवितांना 44 सुवर्ण, 21 रौप्य व चार कांस्य पदकांसह 69 पदकांची कमाई करीत जनरल चॅम्पियनशीपचा राष्ट्रीय खिताब पटकावतांना ‘खेलो इंडिया’ स्पर्धेसाठीचा आपला मार्गही प्रशस्त केला आहे. तामीळनाडूच्या संघाने दुसरे, तर पश्चिम बंगाल आणि हरियाणाच्या संघाला संयुक्तपणे तिसरे स्थान मिळाले. ओडिशा हॉकी कौंसिलचे अध्यक्ष, पद्मश्री दिलीप तिरके यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आणि संघाला पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय योगासन स्पोर्टस फेडरेशनचे अध्यक्ष उदीत शेठ, सरचिटणीस डॉ.जयदीप आर्य, फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, निरंजन मूर्ती, स्पर्धा निर्देशक उमंग डॉन, संयोजक सी.के.पुरोहित, के.आय.आय.टी विद्यापीठाच्या डॉ.सस्मिता सामंता आदी उपस्थित होते.


योगासनांना खेळाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर आयोजित झालेल्या या पहिल्याच स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्त्व करणार्‍या 25 खेळाडूंचा सहभाग होता. कौतुकास्पद बाब म्हणजे यातील 20 खेळाडू संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी होते. योगासनांचे प्रशिक्षक मंगेश खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्ष एकही सुट्टी न घेता या खेळाडूंनी दररोज सहा-सहा तास सराव केला होता. या खेळाडूंना मालपाणी फौंडेशनकडून विशेष शिष्यवृत्तीही दिली जाते.

Visits: 102 Today: 1 Total: 1412886

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *