‘एसएमबीटी’मध्ये मोफत हृदयरोग शिबिर पाच दिवसीय शिबिर; जटील अँजिओप्लास्टी होणार
नायक वृत्तसेवा, संगमनेर
काही रुग्णांना पूर्व वैद्यकीय समस्या असते व काहींना बायपास शस्त्रक्रियेची भीतीही असते. अशावेळी अँजिओप्लास्टी केली जाते. यासाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एसएमबीटी चॅरिटेबल हॉस्पिटलच्यावतीने 12 ते 16 जुलै दरम्यान मोफत हृदयरोग शिबिराचे (जटील अँजिओप्लास्टी) आयोजन करण्यात आले आहे. धामणगाव-घोटी खुर्द येथील एसएमबीटी हॉस्पिटल आणि नाशिक येथील एसएमबीटी क्लिनिक या दोन्ही ठिकाणी हे शिबिर होणार आहे, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
नॅशनल इंटरव्हेशनल कौन्सिल, सीएसआयचे अध्यक्ष डॉ. प्रताप कुमार, एसएमबीटी हॉस्पिटलच्या हार्ट इन्स्टिट्यूटचे विभाग प्रमुख तथा हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा हे तज्ज्ञ डॉक्टर्स तपासणी आणि उपचार करणार आहेत. हृदयविकार रुग्णांना योग्य, प्रभावी, दर्जेदार आणि तत्काळ उपचार मिळण्याकरिता एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट कार्यान्वित करण्यात आले आहे. हा विभाग पूर्णपणे स्वतंत्र असून तो रुग्णसेवेसाठी वर्षातील 365 दिवस सुरू असतो. या विभागात गत सात वर्षांत हृदय विकारांवरील 17 हजार 889 हजारहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही महत्वपूर्ण योजनांशी एसएमबीटी हॉस्पिटल संलग्न आहे. त्या माध्यमातून उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जातात. रुग्णांसोबत असलेले त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांची जेवण आणि राहण्याची सोय देखील करण्यात आली आहे.
या शिबिराच्या अधिक माहितीसाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये (नंदीहिल्स धामणगाव-घोटी खुर्द, ता. इगतपुरी, जि. नाशिक) सकाळी दहा ते पाच या वेळेत 7720053260, 7720053254 आणि एसएमबीटी क्लिनिक (श्री गणेश इलाईट, टीपीएस 2, मुंबई नाका, नाशिक) येथे 7720086876, 8956173173 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.