श्रीरामपूरमध्ये नव्याने पंधरा बाधित सापडले

श्रीरामपूरमध्ये नव्याने पंधरा बाधित सापडले
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यात सोमवारी (ता.17) 58 जणांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 15 व्यक्ती नव्याने बाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या तालुक्यात 501 झाली आहे. सध्या तालुक्यातील संत लूक रुग्णालयामध्ये 36 रुग्ण तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमध्ये 29 जण उपचार घेत आहेत.


दरम्यान, पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या 15 रुग्णांमध्ये प्रभाग एकमध्ये 3, दोनमध्ये 1, तीनमध्ये 2, सातमध्ये 2, पढेगाव 1, वडाळा महादेव 1, बेलापूर 1, महांकाळ वाडगाव 1, अशोकनगर 2, पाथरे 1 आदी रुग्णांचा समावेश आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. वैद्यकीय सेवेवरही ताण वाढत आहे. त्यामुळे सर्वतोपरी काळजी घेण्याचे आणि काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 29256

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *