मराठी चित्रपट महामंडळाच्या समित्यांवर बंदावणे व घोडके

नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील नाट्य चित्रपट कलावंत वंदना बंदावणे व अंतून घोडके यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी विविध समित्यांवर निवड केली आहे.

वंदना बंदावणे यांची महिला ब्रिग्रेडच्या सदस्यपदी तर अंतून घोडके यांची समारंभ समितीच्या सदस्यपदी निवड केल्याचे पत्र पुणे येथे अध्यक्ष भोसले यांनी प्रदान केले. यावेळी महामंडळाचे समन्वयक अनिल गुंजाळ, समारंभ समिती प्रमुख दिग्दर्शक शार्दूल लिहिणे, अॅड.मंदार जोशी, निर्माते वसंत बंदावणे, निर्माते राजेश जोशी, कृष्णा परदेशी, नीलेश जोशी, आनंद खुरे व महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. बंदावणे यांनी अनेक नाटक, चित्रपट, लघुचित्रपट तसेच मालिकेत भूमिका केल्या आहेत. तर घोडके हे कलाकारांच्या रंगकर्मी या संस्थेचे अध्यक्ष असून त्यांनी अनेक चित्रपट, मालिका व लघुचित्रपटांतून भूमिका केल्या असून अनेक लघुपटांची निर्मिती केली आहे. सदर निवडीबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, अॅड.अण्णासाहेब शिंदे महामंडळाच्या सदस्या अभिनेत्री वर्षा उसगावकर, महामंडळाचे नगर जिल्हाप्रमुख शशिकांत नजन, ज्येष्ठ नाटककार डॉ.सोमनाथ मुटकुळे, सूर्यकांत शिंदे, भरारी पथक सदस्य अॅड.भाऊसाहेब गांडोळे यांनी अभिनंदन केले आहे.

