शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांची आर्थिक लूटमार थांबवावी!

शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांची आर्थिक लूटमार थांबवावी!
अकोले ग्राहक पंचायतची गटशिक्षणाधिकार्‍यांकडे निवेदनातून मागणी
नायक वृत्तसेवा, अकोले
कोविड-19 या जागतिक महामारीमुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. अशाही काळात शैक्षाणिक संस्थांनी प्रवेशाच्या वेळी पालकांसह विद्यार्थ्यांची विकास निधीच्या नावाखाली आर्थिक लूटमार चालविली आहे. ती तातडीने थांबवावी अन्यथा संबंधित संस्थेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अकोले ग्राहक पंचायतने दिला आहे.


याबाबत अकोले पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात म्हंटले आहे की तालुक्यात खासगी शिक्षण संस्थांद्वारे विद्यार्थी व पालकांची आर्थिक लूटमार चालविली आहे. शिक्षण संस्था विकास निधीच्या गोंडस नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांकडून रोख रक्कम उकळत आहेत. हे बेकायदेशीर असून अशा संस्था चालकांविरूद्ध फौजदारी कारवाई करावी.


तसेच ज्या संस्थांनी विकास निधीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल केले आहे, ते संबंधितांना परत देण्यात यावे. तसेच दहावीचे दाखले काढताना देखील 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतचे शुल्क शैक्षणिक संस्था वसूल करत आहे. अशांवरही तातडीने कारवाई करावी अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे. या निवेदनावर ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, जिल्हा सचिव रमेश राक्षे, तालुका सचिव दत्ता रत्नपारखी, भाऊसाहेब गोर्डे, कैलास तळेकर, शुभम खर्डे, ज्ञानेश पुंडे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Visits: 10 Today: 1 Total: 117142

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *