रायकरांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर गुन्हा दाखल करा

रायकरांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर गुन्हा दाखल करा
नायक वृत्तसेवा, अकोले
पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू शासनाच्या विविध विभागांच्या समन्वयाअभावी झाला आहे. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अकोले तालुका पत्रकार संघाने केली आहे.


याबाबतचे निवेदन गुरुवारी (ता.2) अकोले तहसीलदार मुकेश कांबळे यांना देण्यात आले. पुणे येथील टीव्ही 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे त्यांची प्रकृती गंभीर असताना शासनाच्या विविध विभागात समन्वयाचा अभाव असल्याने त्यांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकली नाही. त्यामुळे वेळीच उपचार न झाल्याने त्यांचा दुर्दैवी अंत झाला. पुण्यासारख्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध न होणे ही धक्कादायक बाब असून या प्रकाराची चौकशी होवून पत्रकार रायकर यांच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अकोले तालुका पत्रकार संघाने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संघाचे तालुकाध्यक्ष विलास तुपे, सचिव सुभाष खरबस, विश्वस्त प्रा.बाळासाहेब मेहेत्रे, नंदकुमार मंडलिक, श्रीनिवास रेणुकादास, राजेंद्र जाधव, आबासाहेब मंडलिक, सचिन खरात, आकाश देशमुख, हरिभाऊ आवारी, ललित मुर्तडक, भगवान पवार आदी सदस्य उरपस्थित होते.

 

Visits: 6 Today: 1 Total: 27294

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *