‘उम्मत’ फाउंडेशनकडून ऊसतोड कामगारांना ब्लँकेटचे वाटप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील ‘उम्मत’ फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त युवक कांग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या हस्ते ऊस तोडणी कामगारांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्वांच्या चेहर्यावर हसू खुलल्याचे दृश्य दिसले.
ऊसतोड कामगार हे दीड-दोनशे किलोमीटरवरून मजल दरमजल करीत आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी येतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांना तोंड देऊन ते उदरनिर्वाह करतात. यासाठी महिने-महिने कुटुंबापासून दूर राहतात. कडाक्याच्या थंडीपासून त्यांच्या शरीराचे रक्षण व्हावे म्हणून उम्मत फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लँकेटचे वितरण करण्यासोबतच मिठाईचे वाटप करण्यात आले. या भेटीने सर्वांच्या चेहर्यावर हास्य फुलल्याचे दृश्य दिसले. सामाजिक वारसा जपत ऊसतोड कामगारांना मानसिक आधार दिला. ब्लँकेट व मिठाई वाटपाने लहान मुलांच्या चेहर्यावर हास्य फुलले. यामुळे काम करण्यास अधिक ऊर्जा मिळाली असल्याची भावना नगरसेवक व फाउंडेशनचे वसीम नूर मोहम्मद शेख यांनी व्यक्त केली. याप्रसंगी मजहर भाई, अनिस भाई, नदीम भाई, बिंदू जहागिरदार, मुख्तार मणियार, अमजद खान, तोफिक शेख, जुबेर शेख, बाबा भाई, जाकीर भाई, रईस भाई, नईस भाई, अकीब भाई, समद भाई, शाएब खान, लाला भाई, दिलावर पिंजार, फय्याज पठाण, मुख्तार पठाण, फिरोज पठाण, जावेद शेख, हबीब शेख आदी उपस्थित होते. शेवटी मुजीब खान (लालाभाई) यांनी आभार मानले.