शेतकरी हित व सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य ः गडाख गिडेगाव येथे मंत्री शंकरराव गडाख व साखर कारखान्याच्या नूतन संचालकांचा सत्कार

नायक वृत्तसेवा, नेवासा
मंत्रिपदाची हवा डोक्यात जावू न देता शेतकरी हित व सुशिक्षितांना रोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देणार असल्याचा निर्धार नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथे मुळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले पदाधिकार्‍यांसह जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडीबद्दल मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, ज्ञानेश्वर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले, उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, मुळा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडुबाळ कर्डिले तसेच जिल्हा बँक, ज्ञानेश्वर व मुळा कारखान्याचे बिनविरोध निवडून आलेले संचालक उपस्थित होते.

यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले, आज तालुक्यात 40 लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. स्वर्गीय लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या बरोबर काम करताना जिल्हा बँकेतून तालुक्यातील शेतकर्‍यांना पाईपलाईनसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. त्यातून बॅकवॉटर भागाचा विकास होऊन समृद्धी नांदत असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.

ज्ञानेश्वर कारखान्याचे नूतन अध्यक्ष डॉ.नरेंद्र घुले म्हणाले, स्वर्गीय मारुतराव घुले व यशवंतराव गडाख यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधून गेली चाळीस वर्षे तालुक्यातील सर्व संस्था व्यवस्थित चालवल्या, ती परंपरा कायम राखण्याचे काम आम्ही करू. तर जायकवाडी पाणी परवान्याचे अठरा वर्षांचे नूतनीकरण करणे गरजेचे असून शेतकर्‍यांनी ते करावे. यामध्ये शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगून मंत्री शंकरराव गडाखांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.

तर मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, दोन्हीही कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या यात कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मिळालेले मंत्रिपद जनतेमुळे आहे त्यामुळे मंत्रिपदाची हवा डोक्यात कधीही जाऊ देणार नाही. सदैव जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही देत पाण्याने समृद्ध असणारा गोदावरी पट्ट्यातील शेतकरी हा खर्‍या अर्थाने नशीबवान आहे. जोडीला ते कष्ट घेतात, त्यामुळे ही समृद्धी येथे दिसून येते. सर्वच गावांतील विकासकामांना आपण प्राधान्य देणार आहे. कोरोना आल्यामुळे आपली भेट सार्वजनिक स्वरूपात होऊ शकली नाही, ती संधी आज गिडेगावकरांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

यावेळी ज्ञानदेव वाफारे, जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब शेळके, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, बाळासाहेब साळुंके, तुकाराम मिसाळ, संचालक नारायण लोखंडे, नेवासा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप, जनार्दन कदम, काकासाहेब नरवडे, बापूसाहेब कर्डिले, बाळासाहेब पाटील, कैलास झगरे, भीमाशंकर वरखडे, अजय साबळे, बबन भुसारी, काकासाहेब शिंदे, काशिनाथ नवले, भाऊसाहेब कांगुणे, दादासाहेब गांडाळ, शिवाजी कोलते, मच्छिंद्र म्हस्के, नानासाहेब रेपाळे, बाबासाहेब भणगे, सोपान पंडित, बापूसाहेब जंगले, संजय जंगले, रंगनाथ जंगले, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब परदेशी, बबन दरंदले, दामोदर टेमक, योगेश म्हस्के, जबाजी फाटके, प्रभाकर कर्डिले, नीलेश शेळके, रामकिसन शेळके, गणेश ढोकणे, अझहर शेख, सुनील नजन, अंबादास गोरे, दिलीप मते, नानासाहेब नवथर, प्रभाकर कर्डिले, उत्तम गायकवाड, दिगंबर शिंदे, कडूबाळ गायकवाड, बाळासाहेब बनकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.रेवणनाथ पवार यांनी केले तर मुळा कारखान्याचे उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले यांनी आभार मानले.

Visits: 60 Today: 1 Total: 434423

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *