पुणतांबा रेल्वे स्थानकाच्या सर्व प्रश्नांवर विचार करू ः लाहोटी विविध संघटनांचे रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पुणतांबा जंक्शन रेल्वे स्थानक व जलद रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे मुंबई विभागाचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी स्पष्ट केले.

ग्रामपंचायत प्रवासी संघटना, आशा केंद्र व ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. पुणतांबा जंक्शन रेल्वे स्टेशवर सर्व जलद रेल्वे गाड्यांना थांबा मिळणे आवश्यक आहे. तसेच आसन राखीव सुविधा सुरू करावी. प्रवेशद्वार क्रमांक 57 च्या भुयारी मार्गाचे अपूर्ण काम पूर्ण करावे. 58 च्या भुयारी मार्गाचे काम लवकर सुरू करावे यासह इतर मागण्या करण्यात आल्या.

यावेळी सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांनी तर पुणतांबा परिसर प्रवासी संस्थेने विविध मागण्यांचे निवेदन अध्यक्ष विजय धनवटे यांच्या हस्ते दिले. चांगदेवनगरच्या ग्रामस्थांच्यावतीने कामगार नेते सुभाष कुलकर्णी, मनसेच्यावतीने शहरप्रमुख संदीप लाळे, अ‍ॅड. संध्या थोरात, डॉ. सुधाकर जाधव यांनी निवेदने दिली. प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष विलास बोर्डे, सरचिटणीस संजय जोगदंड, खजिनदार संतोष चोरडिया, बाळासाहेब कुलट, भारत बोर्डे, दिलीप कांबळे, शिवसेनेचे नेते अनिल नळे, आशा केंद्राचे किशोर कदम, सर्जेराव जाधव, विकास आघाडीचे चंद्रकांत वाटेकर, ग्रामपंचायत सदस्य योगेश घाटकर, आबासाहेब नळे, अशोक गायकवाड, बाजीराव धनवटे, विलास टिळेकर, शौकत शेख, शिवसेनेचे भास्कर मोटकर, शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी, अनिल निकम, वाल्मिक घोडेकर, सचिन सगळगिळे, विलास कुर्‍हाडे, बाळासाहेब वहाडणे, सुरेश गोर्‍हे, रामभााऊ जाधव, सुभाष शिंदे, मधुकर जगदाळे, शिवाजी वाघमारे, विलास कुलकर्णी, सुखदेव अहिरे, वसंत पवार, संजय लांडगे आदी उपस्थित होते.

Visits: 15 Today: 1 Total: 113854

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *