मुंडके नसलेला मृतदेह आढळला

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील नेवासा रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजखाली अनोळखी इसमाचा मुंडके नसलेला मृतदेह आढळून आल्याने श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.ही घटना ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

रेल्वे रुळांवर मृतदेह आढळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ ही माहिती उपस्टेशन प्रबंधक बेलापूर रेल्वे स्टेशन यांना दिली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे कळविली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह रुळांवरून बाजूला काढला. सदर अनोळखी व्यक्ती अंदाजे ४० ते ४५ वयोगटातील, सावळ्या रंगाची, सडपातळ बांध्याची व सुमारे पाच फूट उंचीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Visits: 41 Today: 4 Total: 1109136
