अरे देवा! संगमनेर तालुक्याच्या रूग्ण संख्येत आजही 38 रुग्णांची भर! शहरातील वकील कॉलनी आणि तालुक्यातील चंदनापुरीमध्ये कोविडचा उद्रेक!!

नायक वृत्तसेवा, संगमनेर

गेल्या दोन-तीन दिवसांपासून लागोपाठ धक्के देणाऱ्या कोरोनाच्या विषाणूंनी आपले धक्कातंत्र आजही कायम ठेवताना संगमनेर तालुक्याच्या रूग्ण संख्येत पुन्हा एकदा मोठी भर घातली आहे. शासकीय प्रयोगशाळेतील दोन, खाजगी प्रयोगशाळेतील एकोणावीस आणि रॅपिड अँटीजेन चाचणीतील सतरा अहवालातून शहरातील अकरा जणांसह तालुक्यातील 38 रुग्ण नव्याने समोर आले आहेत. त्यामुळे तालुक्याच्या रुग्ण संख्येने अवघ्या दोनच दिवसात दोन शतकीय संख्या ओलांडीत 1 हजार 553 ची उंची गाठली आहे.

आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून शहरातील 14 तर तालुक्यातील 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात गिरीराज विहार कॉलनीतील 64 वर्षीय इसम, वकील कॉलनीतील 54 वर्षीय इसम, नेहरु चौकातील 48 वर्षीय इसम, रहेमतनगरमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, इंदिरानगरमधील 52 वर्षीय महिलेसह 46 वर्षीय व 41 वर्षीय तरुण, स्वामी समर्थ नगरमधील 69 व 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांसह 60 वर्षीय महिला, गणेशविहार कॉलनीतील 56 वर्षीय इसम, श्रीराम कॉलनीतील 57 वर्षीय इसमासह 45 वर्षीय महिला व नवीन नगर रस्त्यावरील 56 वर्षीय इसम.

तर, तालुक्यातील गुंजाळवाडी येथील 27 वर्षीय तरुण, तळेगाव दिघे येथील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, घुलेवाडीतील 69 वर्षीय महिलेसह 55 वर्षीय इसम व 30 वर्षीय तरुण, नांदुरी दुमाला येथील 35 वर्षीय महिला, साकूरमधील 41 वर्षीय तरुण व निमगाव जाळी येथील 32 वर्षीय तरुण अशा एकुण आठ जणांसह या अहवालातून 22 रुग्ण समोर आले. त्यामुळे आज सकाळच्या सत्रातच तालुका थेट 1 हजार 515 वर जावून पोहोचला होता. आता त्यात आणखी 38 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची बाधित संख्या 1 हजार 553 वर जाऊन पोहोचली आहे.

आज शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून रहाणेमळा परिसरातील 55 वर्षीय पुरुष व वडगाव पान मधील 26 वर्षीय महिला बाधित झाल्याचे समोर आले आहे. तर खासगी प्रयोगशाळेच्या एकोणावीस अहवालातून शहरातील वकिल कॉलनी परिसरात कोरोनाचा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे. या भागात राहणाऱ्या 80 वर्षीय वयस्कर महिलेसह 57 व 48 वर्षीय महिला 35, 25 व 24 वर्षीय तरुणांचे अहवालही पॉझिटिव आले आहेत. त्यासोबतच शिवाजीनगर परिसरातील 41 वर्षीय तरुण अभिनवनगर मधील 26 वर्षीय महिला, मेनरोड परिसरातील 48 वर्षीय पुरुष, जाखोरी येथील 38 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 51 वर्षीय महिला व 56 वर्षीय पुरुष.

गिरीराज विहार येथील 35 वर्षीय तरुण व 57 वर्षीय महिला, निमोण मधील 62 वर्षीय महिला, सोनेवाडी येथील 35 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द मधील 43 वर्षीय तरुण, हासे मळा येथील 52 वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथील 48 वर्षीय पुरुष, भारत नगर परिसरातील 31 वर्षीय महिला, लोहारे येथील 64 वर्षीय पुरुष, कुरकुटवाडी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय महिला, बोटा येथील 55 वर्षीय महिला.

वायाळवाडी येथील 26 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडी येथील 95 वर्षीय वयोवृद्ध, 42 वर्षीय, 28 वर्षीय महिला व पंचवीस वर्षीय तरुण, तालुक्यातील चंदनापुरी येथील 72, 55 व 43 वर्षीय महिला, 42, 38 व तेहतीस वर्षीय तरुण, तसेच सात वर्षीय बालिका, खराडी येथील 38 वर्षीय महिला, तर साकुर मधील 52 वर्षीय इसमाचा अहवाल आला आहे. तालुक्याच्या रुग्ण संख्येत गेल्या तीन ते चार दिवसात मोठ्या संख्येने वाढ झाल्याने तालुक्यातील आकडा 1 हजार 553 वर जाऊन पोहोचला आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीत जिल्ह्यातील संख्येत 244 रुग्णांची भर..!

प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीतून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ५६, संगमनेर तालुक्यातील १७, राहाता तालुक्यातील २६, पाथर्डी तालुक्यातील २१, श्रीरामपुर तालुक्यातील १५, अहमदनगरच्या लष्करी क्षेत्रातून ०९, नेवासा तालुक्यातील १३, श्रीगोंदा तालुक्यातील २१, अकोले तालुक्यातील १३, राहुरी तालुक्यातील ०२, शेवगाव तालुक्यातील ०९, कोपरगाव तालुक्यातील २६, जामखेड तालुक्यातील ०६ आणि कर्जत तालुक्यातील १० रुग्ण समोर आले आहेत. 

Visits: 204 Today: 2 Total: 1120961

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *