जेईई व नीट परीक्षा पुढे ढकला; एनएसयूआयची मागणी

जेईई व नीट परीक्षा पुढे ढकला; एनएसयूआयची मागणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या देशात व राज्यात कोरोनाचे संकट आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. अशातच केंद्र सरकारने 6 सप्टेंबर व 13 सप्टेंबर रोजी जेईई व नीट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी अहमदनगर एनएसयूआयच्यावतीने करण्यात आली आहे.


महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ.सुधीर तांबे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे मार्गदर्शनाखाली संगमनेर प्रांत कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांना विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, तालुकाध्यक्ष गौरव डोंगरे, तालुका उपाध्यक्ष शेखर सोसे, शहर उपाध्यक्ष निखील पवार, शहर उपाध्यक्ष हैदरअली सय्यद, महासचिव रोहित बनकर, सिद्धेश घाडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 4 Today: 1 Total: 27267

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *