भारत विद्यालयामध्ये ‘रेझिंग डे’ साजरा
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील भारत विद्यालयामध्ये सोमवारी (ता.4) ‘रेझिंग डे’ निमित्ताने विद्यार्थ्यांना पोलिसांनी कामकाजाविषयी माहिती व शस्त्र हाताळणी प्रात्यक्षिकाचे आयोजन करत मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थीही भारावून गेले होते.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त 2 जानेवारी ते 8 जानेवारी असा पोलीस रेसिंग डे सप्ताह साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धीरज राऊत, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर लाड, गणेश तळपाडे यांनी भारत विद्यालयामध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती व प्रात्यक्षिक दाखवले. पहिल्यांदाच शस्त्र हातात घेतल्याने विद्यार्थांचाही आनंद गगनात मावत नव्हता. विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास खरात यांनी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक विजय कडाळे यांनी केले तर आभार समीर वेठेकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.