अहमदनगर शहरात हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर छापा

नायक वृत्तसेवा, नगर
शहरातील वाणीनगर व केडगावमधील अंबिकानगर येथील हायप्रोफाईल वेश्या व्यवसायावर सोमवारी (ता.25) पोलिसांनी छापा टाकून तीन पीडित बंगाली महिलांची सुटका केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना अहमदनगर शहरातील वाणीनगर व केडगावमधील अंबिकानगर येथे हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून छापा टाकून तीन पीडित बंगाली महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक एकनाथ लांडगे (वय 30) व सागर जाधव यांच्याविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं. 947/2021 स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी फिर्याद पोलीस नाईक शाहिद शेख यांनी दिली असून, योगेश पोपट ओव्हाळ (रा. माळीवाडा) याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुरनं. 799/2021 महिलांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळंके, स.फौज. राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ. सुरेश औटी, पो.कॉ. तरटे, अमोल शिरसाठ, चेतन मोहिते, गौतम सातपुते, सचिन जाधव, शाहिद शेख, विष्णू भागवत, सुमित गवळी, दीपक रोहकले, जयश्री सुद्रिक, प्रियंका भिंगरदिवे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *