‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ स्पर्धेत आर्य डोंगरेची चमकदार कामगिरी

नायक वृत्तसेवा, नगर
‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर’ ह्या स्पर्धेमध्ये आपल्या नृत्यांनी परीक्षक आणि प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करणारा स्पर्धक म्हणजे आर्य डोंगरे. आर्य हा मूळचा पुण्याचा आहे. लहानपणापासून त्याला नृत्याची आवड असल्याने त्याने स्वतःला नृत्यालाच वाहून घेतलं आहे. ओमकार शिंदे यांच्या ओम अकॅडेमी या नृत्यशाळेत इन्स्ट्रक्टर म्हणून आर्य काम करतो आहे.

यापूर्वी काही रियॅलिटी शोजमध्ये आर्यने सहभाग घेतला होता, पण तो फार पुढे जाऊ शकला नाही. महाराष्ट्राज बेस्ट डान्सर ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला मिळालेली सुवर्णसंधी आहे, असं तो मानतो. त्याच्या आईलाही नृत्याची आवड असल्याने आर्यला आईचा लहानपणापासून पाठिंबा मिळाला आहे. एवढंच नाही तर आर्यने आपल्या आईला नृत्यही शिकवलं आणि एका स्पर्धेत सहभागी व्हायला लावलं होतं. खरेतर आई मुलांची गुरू असते, पण आर्य तिचा गुरू आहे, असे आर्यच्या आईचे म्हणणे आहे. आधी टॉप 12 आणि मग टॉप 10 अशी मजल मारत आर्यची महाराष्ट्राज बेस्ट डान्सर मधली घोडदौड यशस्वीरित्या सुरू आहे. परीक्षकांनाही त्याचे सादरीकरण आवडते. नुकतेच अभिनेता तथा खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी आपल्या समाज माध्यमावरुन फोक फ्युजन एपिसोडमध्ये सादर केलेल्या आर्यच्या नृत्याचे कौतुक केले आहे. त्यामुळे पुण्याच्या सुपुत्राला भरभरून वोट करा आणि दर सोमवार, मंगळवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर हा कार्यक्रम अवश्य पहा असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 4 Today: 1 Total: 27312

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *