पत्रकार गोरक्ष नेहेंना ‘आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील सावरगाव तळ येथील मूळ रहिवासी असलेले वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी असलेले गोरक्ष दशरथ नेहे यांना महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्यावतीने देण्यात येणारा ‘आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ जाहीर झाला असल्याची माहिती सरपंच सेवा संघाचे राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून पत्रकार गोरक्ष नेहे यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. विविध विषयांवर आत्तापर्यंत त्यांनी प्रखरपणे लिखाण करून पत्रकारितेत वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या याच पत्रकारितेची महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी दखल घेतली आहे. त्यांच्या पत्रकारितेचा गौरव व्हावा म्हणून दर्पण दिनी शिर्डी येथे सरपंच सेवा संघाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पत्रकार गोरक्ष नेहे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. सदर पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Visits: 116 Today: 1 Total: 1103059

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *