उपाययोजना केल्याने एकही कोविड रुग्ण सापडला नाही ः बाकलीवाल

उपाययोजना केल्याने एकही कोविड रुग्ण सापडला नाही ः बाकलीवाल
प्रवरासंगम ग्रामपंचायतच्या प्रशासकाची नवनाथ पाखरेंनी स्वीकारली सूत्रे
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील प्रवरासंगम येथील सरपंच सुनील बाकलीवाल यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल प्रवरासंगम ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात गौरव करण्यात आला. सरपंचपदाची मुदत संपल्यानंतर प्रशासक नवनाथ पाखरे यांनी सूत्रे हाती घेतली. तेव्हा बाकलीवाल यांचा गौरव करण्यात आला. गावाच्या विकासासाठी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करणे गरजेचे असून अधिक सावधानता बाळगून त्यादृष्टीने उपाययोजना केल्याने प्रवरासंगम येथे कोविड रुग्ण आढळला नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला.


पुढे बोलताना सरपंच बाकलीवाल म्हणाले, आपण सरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पाच वर्षांत एकदाही महिलेला पाण्यासाठी वणवण फिरू दिले नाही. हिंदू स्मशानभूमीसह गावातील काँक्रिटीकरण, दलित स्मशानभूमी, पथदिवे असे विविध विकासकामे मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली केली. लॉकडाऊन काळात परप्रांतीयांना जेवण पुरविले, गावात गाडी फिरवून कोरोना विषयक जनजागृती केली. त्यामुळे गावात कोरोना रुग्ण आढळला नाही. वेळोवेळी फवारणी केली, गटारी, सांडपाणी याबाबत काळजी घेतली. तसेच आदी कामेही जनतेने व सर्व सदस्यांनी दिलेल्या साथीमुळेच करू शकलो असे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. गावाच्या विकासासाठी एकमेकांना विश्वासात घेऊन काम करा असे आवाहनही शेवटी त्यांनी केले.


याप्रसंगी बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य पांडूरंग काळे, संदीप सुडके, नितीन भालेराव, माधव शिंदे, प्रदीप जगधने, ग्रामसेवक सुभाष शेळके, बालविकास प्रकल्प अधिकारी सुनील अंकुश, वृषभ बाकलीवाल उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *